अहमदनगर ब्रेकिंग : शहरातील या रस्त्याला खासदार सुजय विखेंचे नाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यातील खड्ड्यांबरोबरच शहरातील खड्डे व नादुरुस्त रस्ते गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. यातच शहरातील खड्डे प्रश्नावरून मनसेने आक्रमक भूमिका घेत खासदार विखेंना टार्गेट केले आहे.

शहरातील काटवन खंडोबाकडे जाणारा रोड गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. रस्त्यावर खड्यांमुळे रस्त्याची पूर्णतः चाळण झाली आहे. मनपाने या रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव ठेवला होता.

तो मंजूर देखील झाला होता. त्यासाठी १५ लाख रुपये आले होते. परंतु भारतीय जनता पक्षाच्या काही नगरसेवकांनी खासदार निधीतून हा रोड होईल, असे सांगितले.

त्यानुसार आयुक्तांनी प्रस्ताव केला आणि रस्ता खासदार निधीकडे वळवला. त्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र दिले. परंतु दोन वर्षांपासून रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही.

दरम्यान भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीच या रस्त्यांच्या दुरुस्तीला खोडा घातला असल्याचा आरोप मनसेने केला. तसेच काटवन खंडोबा रोडला खासदार डॉ. सुजय विखे पाटील मार्ग, असे नामकरण केले.

आठ दिवसांमध्ये रस्त्यांच्या दुरुस्ती झाली नाही तर मनसे स्टाईलने खा. विखे आणि आयुक्त यांच्याविरुद्ध आंदोलन केले जाईल, असा इशारा सचिन डफळ यांनी दिला.

दरम्यान शहरातील आयुर्वेदिक कॉलेज चौकातून काटवन खंडोबाकडे रोडवर मनसे पदाधिकाऱ्यांनी आज हे आंदोलन केले. हे आंदोलन मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ व सचिव नितीन भुतारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment