कोरोनामुळे माजी सरपंचासह तिघांचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-  राहुरी तालुक्यातील तिघांना सोमवारी कोरोनामुळे जीव गमवावा लागला. तथापि, त्याची नोंद जिल्ह्याच्या आकडेवारी नाही.

वांबोरी येथील माजी सरपंच संभाजी मोरे (५२) यांचे सोमवारी पहाटे नगर येथील खासगी रुग्णालयात कोरोनामुळे निधन झाले. ते केएसबी कंपनी कामगारांचे प्रतिनिधी म्हणून काम करत होते.

कामगार पतसंस्थेचे ते अध्यक्षही होते. माजी आमदार शिवाजी कर्डिले, तसेच राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याबरोबर ते राजकारणात सक्रिय होते.

तनपुरे यांना कोरोना झाला, त्यावेळी त्यांच्या दौऱ्यात मोरे होते. वांबोरीत अन्य एक वृध्द व्यक्ती नगरमध्ये मरण पावली. चेडगाव येथील वृध्दाचाही खासगी रुग्णालयात मृत्यू झाला, असे सोमवारच्या वैद्यकीय अहवालात म्हटले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment