‘त्या’ प्रकरणावरून वाल्मिकी मेहतर समाज आक्रमक ; 12 ऑक्टोबरला करणार ‘असे’ काही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- उत्तर प्रदेश राज्यातील हाथरस बलात्कार प्रकरणाने देशभर संतापाची लाट उसळली. या झालेल्या प्रकरणामुळे वाल्मिकी मेहतर समाज आक्रमक झाला आहे.

याचे पडसाद श्रीरामपूर तालुक्यात उमटले. येथील प्रांत कार्यालय येथे नगरसेविका प्रणिती चव्हाण, दीपक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व तालुका सकल पंचच्या उपस्थितीमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी धनवटे, अंतोन शेळके, राहुल आठवाल, आदी समाज बांधवांनी आपल्या तिव्र भावना व्यक्त केल्या. प्रास्ताविक भाषणात दीपक चव्हाण यांनी हाथरसचे खासदार पीडित कुटुंबियांना भेटून मदत करण्याऐवजी कारागृहात

आरोपींची भेट घेतात तर उत्तर प्रदेश प्रशासन गुंड प्रवृत्तीला खतपाणी घालतात याचा निषेध म्हणून 12 ऑक्टोबर रोजी संपूर्ण जिल्ह्यातून समाज बांधवांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती दिली.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील हाथसर येथील आदिवासी मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ उत्तर प्रदेशात झालेल्या पीडितेच्या अत्याचार प्रकरणात देशभरात संताप व्यक्त होत आहे.

तर दुसरीकडे राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जात असताना त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. या दोन्ही घटना म्हणजे लोकशाहीवर घाला असल्याची टीका विरोधक करत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment