बिग ब्रेकिंग : केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांचे निधन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :-  केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन झाले आहे. दिल्लीतील रुग्णालयात त्यांचे निधन झाले आहे. 

रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान यांनी ट्वीट करुन निधन झाल्याची माहिती दिली आहे.

रामविलास पासवान हे लोकजनशक्ती पार्टी (लोजपा) चे राष्ट्रीय अध्यक्ष हेत् त्यांच्या पक्ष केंद्रातील मोदी सरकारमध्ये सहभागी आहे.

७३ वर्षीय पासवान यांनी लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. तर ते राज्यसभा सदस्य होते.

बिहारच्या राजकारणात रामविलास पासवान यांचा मोठा दबदबा आहे. पासवान यांनी १९६० च्या दशकात राजकारणाची सुरुवात केली.

पहिल्यांदा आमदार राहिलेल्या पासवान यांनी हाजीपूर मतदारसंघातून ४ लाख मतांनी विजय मिळवला होता. त्यामुळे ते देशभर चर्चेत आले होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment