पोलिसांनी ‘या’ वसाहतीत छापा मारत जप्त केले 800 किलो गोमांस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनाच्या काळात वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्यात आली असल्याने अनेक दिवस जनावरांची तस्करी होण्याचे प्रकार थांबले होते.

मात्र आता वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरु झाल्याने गोवंश जनावराची तस्करीच्या घटना पुन्हा घडू लागल्या आहेत. संगमनेर शहरातील जमजम वसाहतीमध्ये शहर पोलिसांनी गुरुवारी रात्रीच्या सुमारास छापा मारत 800 किलो गोमांस,

पाच जर्सी वासरे आणि एक जर्सी गाय असा एकूण 1 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,

शहरातील जमजम वसाहतीमध्ये जहीर अन्वर कुरेशी याच्या वाड्यात गोमांस आणि कत्तलीच्या उद्देशाने जनावरे ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा मारत 1 लाख 60 हजार रुपयांचे 800 किलो गोमांस, 25 हजार रुपये किंमतीचे पाच जर्सी वासरे आणि 10 हजार रुपये किंमतीची एक जर्सी गास असा एकूण 1 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल

पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक रमेश लबडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी जहीर कुरेशी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आशिष आरवडे हे करत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment