शहरासह झोपडपट्टी भागातील अवैध व्यवसाय बंद करावे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- शहरातील अवैध व्यवसाय त्वरित बंद करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाच्या वतीने पोलीस उप अधिक्षक विशाल ढुमे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.

यावेळी आरपीआयचे अजय साळवे, प्रा.भीमराव पगारे, चंद्रकांत भिंगारदिवे, प्रा.जयंत गायकवाड, बबन भिंगारदिवे, अमित भिंगारदिवे, अमित काळे, विनोद भिंगारदिवे, तुकाराम भिंगारदिवे, प्रवीण चाबुकस्वार, सुशील घगाळे आदी उपस्थित होते. अहमदनगर जिल्ह्यामध्ये व शहरामध्ये दारू, मटका, जुगार, वाळू तस्करीचे अवैध व्यवसाय फोफावले आहे.

तर मंगळसूत्र चोरी, लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत. कायद्याचा धाक नसल्याने गुंड व अवैध व्यावसायिकांची दहशत वाढली असून, शहरातील सर्व झोपडपट्टी भागांमध्ये दारू, मटका, जुगार, अमली पदार्थांची विक्री सर्रास सुरु आहे. अमली पदार्थाची विक्री करणार्‍यांना विरोध केल्यास त्यांचे गुंड प्रवृत्तीचे साथीदार दमबाजी करून जीवे मारण्याची धमकी देतात.

पोलीस सदर गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पाठिशी घालत असल्याने झोपडपट्टीतील नागरिक भीतीपोटी विरोध करीत नाहीत. त्यामुळे सदर भागातील दारुडे, जुगारी व गांजा पिणारे आरडाओरड करून शांतता भंग करीत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

शहरातील अवैध व्यवसाय त्वरित बंद करण्यात यावे, विशेष करून झोपडपट्टी भागातील अवैध व्यवसाय करणार्‍यांना एम.पी.डी. कायद्याखाली अटक करुन त्यांना तडीपार करण्याची मागणी आरपीआयने केली आहे. कारवाई होत नसेल तर शहरातील दारू, मटका, गांजा, जुगार बंद होत नसतील

तर या अवैध व्यवसायाचा पोलिस प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव पाठवून या धंद्यांना मान्यता देऊन त्यांच्याकडून महसुल गोळा करण्याची उपरोधक मागणी देखील करण्यात आली. शहरातील सदर अवैध व्यवसाय बंद न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment