अहमदनगर शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :-महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा योजनेवरील देहरे येथील भुयारी मार्गाच्या कामासाठी नव्याने टाकण्यात आलेली जलवाहिनी जोडण्याच्या कामामुळे पाण्याचा उपसा बंद होता.

शुक्रवारी दुपारी काम पूर्ण झाले. तथापि, महावितरणकडून १० आॅक्टोबरला दुरूस्तीचे काम केले जाणार असल्याने पुढील तीन ते चार दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

दुरूस्तीच्या कारणास्तव बंद झालेला पाणी उपसा पुन्हा सुरळीत होण्यात तीन ते चार तासांचा अवधी लागतो. पाणी पुरवठा बंद असलेल्या नागरी भागाला टप्प्याटप्प्याने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन मनपाने आखले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment