उत्तम संघटक आणि कुशल व्यवस्थापक: स्व.राजीव राजळे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- राजीवजी यांनी आर्किटेक्ट पदवी घेतली होती. उत्तम संघटक आणि कुशल व्यवस्थापक म्हणून त्यांची ख्याती होती. विधानसभेत उत्कृष्ट वक्ता म्हणून त्यांना गौरवण्यात आलं होतं.विधानसभेतील त्यांची भाषणे लक्षवेधी ठरली होती. राजीवजी यांचं व्यक्तीमत्व अष्टपैलू होतं.

टेक्नोसॅव्ही म्हणूनही त्यांची ओळख होती. राजीवजींचा जनसंपर्क दांडगा होता. ग्रामीण राजकारणाची जाण असणारे, उत्तम वक्तृत्व शैली,वैयक्तिक मैत्रीचा वसा जपणारे, उत्तम वाचक, निरीक्षक,उत्कृष्ट वक्ता म्हणून राजीव राजळे यांनी आपला ठसा उमटवला. कृषी,संस्कृती,काव्य,लेखन,तांत्रिक ज्ञान,संगणक,आदी क्षेत्रात त्यांचा अभ्यास होता.

वाचनाची प्रचंड आवड,,शास्रीय संगीत ऐकणे,अधूनमधून चित्रपट पाहाणे आदी छंद त्यांनी जोपासले.लोकप्रतिनिधी ही गोष्ट मिरवण्यासाठी नव्हे,तर जनतेला सावरण्यासाठी या पदाचा उपयोग व्हावा,अशी त्यांची धारणा होती.त्यांच्या गाडीमध्ये पुस्तकांचे नेहमी भांडार असायचे.

नियमित वाचन असल्याने कोणत्याही विषयांवर बोलण्याची त्यांची केव्हाही तयारी असायची. सन २०१३ साली अहमदनगरला त्यांनी भव्य ‘बुक फेस्ट’चे आयोजन केले होते,मला युवकांशी संवाद साधण्यासाठी त्यामध्ये त्यांनी निमंत्रित केले होते,नगर सारख्या ठिकाणी त्यांनी उत्तम व्यवस्थापकीय कौशल्य दाखवत राष्ट्रीय दर्जाचे ‘बुक फेस्ट’चे यशस्वीरीत्या आयोजन केले.

त्यावेळी त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मी स्वत: ‘आयपॅड’ वापरण्यास सुरवात केली.त्यावेळी त्यांच्या घरी भेट दिल्यानंतर मी पाहीले की त्यांच्या घरात पुस्तकांचा खजिनाच आहे,संगणक व स्मार्टफोनच्या काळात आज वाचन संस्कृती लोप पावत चालली असताना राजीवजींनी वाचनाचा आपला हा छंद जोपासला.

जगभर पसरलेल्या माझ्या हाॅटेल व्यवसायामुळे मी जगभर भ्रमंती करत असतो,त्यामुळे जगात काय चालले आहे हे समजते,राजीवजी पाथर्डीचे लोकप्रतिनिधीत्व करत असताना देखील त्यांचा जगाच्या राजकारणाचा,अर्थकारणाचा,इतिहासाचा,साहित्याचा धांडगा अभ्यास होता.

सुशिक्षित तरुणांनी राजकारणात यावे यासाठी त्यांचा नेहमी आग्रह असायचा,तरुण कार्यकर्त्यांना ते नेहमी प्रोत्साहन द्यायचे. राजीवजी म्हणजे सळसळत्या तरुणाईचा अभ्यासू लोकप्रतिनिधी,त्यांचा सारखा उमदा,हरहुन्नरी,माणसांची व कलेची जाण असणारा मित्र आपल्यातुन एवढ्या लवकर निघुन गेला,यावर विश्वास बसत नाही.

राजीवजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन…! विठ्ठल कामत

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment