आमदारांनी पर्यटनासाठी नगरकरांना घातली साद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक वारसा जोपासून इतिहासाबरोबर देशामध्ये नगर शहराला प्रगतशील करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. नगर शहराच्या विकासाबाबत नागरिकांना सोबत घेऊन शासनाला सर्वांगिण विकासाचा आराखडा सादर केला जाणार आहे. नगरच्या पर्यटन विकासाला चालना मिळावी, यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व राज्यमंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन निधीची मागणी केली आहे. या निधीसाठी शासनाकडे विकास आराखडा सादर करावयाचा आहे. 

विविध मान्यवरांकडून व पर्यटन प्रेमींकडून माहिती घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले. नगर शहर पर्यटन विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी आ. संग्राम जगताप व रसिक ग्रुपचे संस्थापक जयंत येलूलकर यांच्या पुढाकारातून निमंत्रित व्यक्तींच्या बैठकीत बोलताना आ. संग्राम जगताप.

समवेत उद्योजक अण्णासाहेब मुनोत, प्रा. माणिकराव विधाते, गणेश भोसले, श्रीधर केळकर, रमेश जंगले, भूषण देशमुख, नाना बोज़ा, आर्किटेक्ट सलीम शेख, प्रा. सीताराम काकडे, विशाल लाहोटी, संदीप जोशी, स्वप्नील मुनोत, पुष्कर तांबोळी, आदेश चंगेडिया, शारदा होशिंग, रफिक मुन्शी, श्रीकांत मांढरे, अँड. आर. आर. पिल्ले, प्रियदर्शन बंडेलू, संजय चोपडा, क्रषिकेश येलूलकर, सुदर्शन कुलकर्णी, महेश कांबळे मेहेर तिवारी आदी यावेळी उपस्थित होते.

आ. जगताप पुढे म्हणाले की, विकास कामे करीत असताना विविध अडचणींना व संकटाला सामोरे जावे लागते. शहराच्या विकासासाठी इच्छा शक्तीची गरज आहे. पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर विधानसभेत पहिला प्रश्न मांडला तो, सीना नदीवरीलअतिक्रमण काढून हद्द निश्‍चितीचा आज ही दोन्ही कामे पूर्ण झाली. लवकरच सीना नदीचा विकास आराखडा तयार केला जाईल. महापौर असताना पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडून सीना नदीच्या सुशोभिकरणासाठी साडे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला होता.

परंतु काहींनी ते काम बंद पाडले आणि तो निधी परत गेला. नगर शहर हे स्वच्छ, सुंदर व हरित करण्यासाठी गेल्या २ वर्षापूर्वी कचराकुंडीमुक्त शहर करण्याची संकल्पना केली होती. त्यानंतर शहरामध्ये गाड्या आणून संपूर्ण शहर कचरामुक्त केले आहे. आज शहरात कुठेही कचराकुंडी दिसणार नाही. आकाशवाणी केंद्र ते भिस्तबाग महाला पर्यंतचा रस्ता हा मॉडेल रस्ता करणार आहे. या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात झाडे लावण्यात येणार आहे.

शहराबद्दल प्रत्येकाने प्रेमाची व आपुलकीची भावना दाखविली पाहिजे. शहरामध्ये पर्यटनाची चळवळ उभी करण्यासाठी जनजागृतीची आवश्यकता आहे. यासाठी सर्व नगरकरांना सामावून घेतले जाईल. नगर शहर हे माझे कुटुंब आहे या भावनेतून व सकारात्मक दृष्टिकोनातून प्रत्येक वर्षी विकास आराखड्यातील एक-एक प्रश्न मार्गी लावला जाईल. समाजामध्ये विचार मांडण्यासाठी पुढे यावे लागते. यासाठी जीवनातील पहिले सामाजिक काम म्हणून आनंदक्रषी महाराजांच्या समाधीजवळील रस्त्यालगत वृक्षारोपण व संवर्धन केल्यामुळे आज ते मोठे वृक्ष झाले आहे.

वृक्षारोपण व संवर्धन ही लोकचळवळ व्हावी व यासाठी जनजागृतीची खरी गरज आहे. भुईकोट किल्याला ऐतिहासिक वारसा आहे. या किल्ल्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची खरी गरज आहे. या किल्ल्याच्या पर्यटन विकास कामे करण्यामध्ये संरक्षण खात्याच्या विविध अडचणी येत असतात. हे सोडविण्यासाठी सर्वजण प्रयत्न करु असे ते म्हणाले. यावेळी विविध मान्यवरांनी पर्यटन विकासासाठी बैठकीत विविध सूचना मांडल्या.

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी शहरात स्वच्छता बाळगावी. पर्यटन विकासाबाबत अभियंते, वास्तुविशारद, विद्यार्थी, पर्यटन प्रेमी तसेच नागरिकांकडून त्यांची मते व त्यांच्या कल्पना मागवाव्यात. आमदार व खासदार निधीतील काही हिस्सा ठरवून पर्यटन विकासावर खर्च करावा. भुईकोट किल्ला सुशोभित करुन तेथे लेझर शो व उद्यान विकसित व्हावे. शहरातील चौक लोकसहभागातून सुशोभित करावे. दरवर्षी एका पर्यटन स्थळावर लक्ष केंद्रीत करुन त्याचा सर्वांगिण विकास करावा. सिनेमा व मालिकांच्या चित्रीकरणासाठी नगर शहराजवळ चित्रनगरी निर्माण करावा.

पर्यटन विकासाबाबत जगभर असणाऱ्या नगरकरांची मते जाणून घ्यावीत. नेहरु पुतळ्याजवळील उद्यानाचे सुशोभिकरण करावे. चांगल्या कामातून नगरचा ब्रँड तयार करावा. राजकारण बाह्य विचारमंच असावा. असे विविध प्रश्न मान्यवरांनी उपस्थित केले. यावेळी कोहिनूरचे संचालक कै. दीपक गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली. जयंत येलूलकर यांनी बैठकीमागील हेतू विशद केला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment