म्हतारपणाची काठी असलेल्या नातवाने केला आजी- आजोबांवर जीवघेणा हल्ला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- आपल्या म्हतारपणाची काठी म्हणून मोठ्या लाडाने आजी आजोबा आपल्या नातवाला सांभाळत असतात. मात्र खुद्द नातूच आजी – आजोबांच्या जीवववर उठला असल्याचा प्रकार जिल्ह्यातील पारनेरमध्ये घडला आहे.

वडीलांना दमदाटी करण्याचे कारण पुढे करून तसेच शेतामध्ये येउ नये यासाठी दहशत निर्माण करण्यासाठी पारनेर तालुक्यातील भांडगाव येथे दोघा नातवांनी आजी आजोबांवर कोयत्याने वार केले. नातवांच्या हल्ल्यात आजी आजोबा गंभीर जखमी झाले असून त्यांना पारनेरच्या ग्रामिण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी कि, सिद्धेश संदीप खरमाळे व जयेश संदीप खरमाळे या दोघा नातवांनी संगनमत करून प्रकाश माधव खरमाळे वय 63 यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व कोयत्याने वार करत जखमी केले. तसेच यावेळी पतीच्या बचावासाठी आलेल्या ताराबाई खरमाळे यांच्यावर देखील कोयत्याने हल्ला चढविला.

त्यात ताराबाईंच्या हातावर वार झाला. त्यात प्रकाश व ताराबाई दोघे जखमी झाले. तुम्ही परत मळयात आले तर तुमचा काटा काढू अशी धमकी देउन देविदास नागुजी खरमाळे यांच्या घरासमोर घडलेल्या घटनास्थळावरून दोघे आरोपी पसार झाले. जखमी प्रकाश तसेच ताराबाई यांना त्यांच्या नातेवाईकांनी पारनेर येथील ग्रामिण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

तेथे प्रकाश यांनी दिलेल्या जबाबावरून सिद्धेश संदीप खरमाळे व जयेश संदीप खरमाळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. जी एस पंदरकर हे पुढील तपास करीत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment