अबब! कांदा वाढला ; जाणून घ्या दर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- कांदा चांगलाच तेजीत आला असून,काल सोमवारी नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये प्रतिक्विंटल भावात कांद्याने 6 हजारांचा टप्पा पार केला आहे.

अतिवृष्टीमुळे यंदा अन्य राज्यातील कांदा पीक वाया गेल्याने कांद्याला भावात तेजी आली आहे. आज येथील बाजार समितीत सुमारे 27 हजार 613 गोण्याची आवक झाली होती. काही वक्कलांना 6 हजार 100 रुपये भाव मिळाला.

एक नंबर कांद्याला 4500 ते 5500 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. दोन नंबरला 4000 ते 4300 रुपये, गोल्टी कांद्याला 3500 ते 3700 रुपये भाव मिळाला. तीन नंबरच्या कांद्याला 500 ते 1300 रुपये भाव मिळाला.

सुपर बिग क्वॉलिटीच्या एक-दोन वक्कलांना 6100 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. शेतकर्‍यांकडे सध्या कांदा राहिलेला नाही. नगर जिल्ह्यात पावसामुळे लाल कांदा येऊ शकला नाही.

त्याचबरोबर उन्हाळी कांदाही खराब वातावरणामुळे निम्म्याहून अधिक सडला. त्यामुळे शेतकर्‍यांना तो लवकर विकावा लागला.

त्यापैकीच काही शिल्लक राहिलेल्या मोजक्याच शेतकर्‍यांकडे सध्या कांदा असून त्यामुळे भावात वाढ झाली असली तरी कांदाच नसल्याने मार्केटमध्ये आवकेत घट सुरू आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment