अहमदनगर ब्रेकिंग! पोलीस निरीक्षक विकास वाघ अखेर निलंबित

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- कोतवाली पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक व सध्या आर्थिक गुन्हे शाखेमध्ये असलेले विकास वाघ यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता.

दरम्यान अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेले पोलीस निरीक्षक विकास वाघ याला अखेर निलंबित करण्यात आले आहे. एका महिलेने विकास वाघ याने वारंवार धमकी देत अत्याचार केल्याची फिर्याद दिलेली आहे.

त्यानुसार जिल्हा पोलीस अधिक्षकांनी पाठविलेल्या अहवालानुसार पोलीस महानिरीक्षकांनी वाघ याला निलंबित केले आहे. फिर्याद महिलेने म्हंटले होते कि, बंदुकीचा धाक दाखवत व मारहाण करत वाघ याने वेळोवेळी अत्याचार केले.

अत्याचारास प्रतिकार केल्यास कंबरपट्ट्याने वाघ याने मारहाण केली. समाजाच्या रक्षण करण्याची शपथ घेणारा हा भक्षक अखेरीस निलंबित झाला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment