मंदिर बंद, उघडले बार, उद्धवा, धुंद तुझे सरकार..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :-  राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी आज भाजपकडून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. आज सकाळपासूनच साईंच्या शिर्डीमध्ये भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

मंदिर बंद, उघडले बार, उद्धवा, धुंद तुझे सरकार.. अशा प्रकारचा नारा देत राज्यातील मंदिरे भक्तांसाठी खुली करावीत, या मागणीसाठी भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने राज्यभरात आंदोलने केली जात आहेत.

मंगळवारी (दि.१३ ऑक्टोबर) सकाळी साडेदहा वाजता नगरपंचायत शॉपिंग कॉम्प्लेक्स मैदानात उपोषण सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी धर्मगुरू आणि आचार्यांकडून लाक्षणिक उपोषण करण्यात आले .

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात फलकबाजीही करण्यात आली. या आंदोलनात महंत सुधीरदास महाराज, भाऊ महाराज फुरसुंगीकर, संजय महाराज धोंडगे, सुदर्शन महाराज कपाटे,

आचार्य जिनेन्द्र जैन, प्रकाश महाराज गंगवाल, बबनराव मुठे, बालम भाई इनामदार आदी व्यासपीठावर आहेत. .दरम्यान मंदिरं खुली करण्यासाठी या आधीसुद्धा भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आला होता.

मात्र ठाकरे सरकराने त्याचे फारसे गांभीर्य घेतले नव्हते. त्यानंतर पुन्हा आता आज राज्यभरात भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment