अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणास पोलिसांकडून अटक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :-  शहरात सारसनगर चिपाडे मळा परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील १६ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा वैभव विजय औटी, वय २६ रा. नेवासा, ता. नेवासा हल्ली रा. भोसले आखाडा, नगर याने विनयभंग केला आहे.

सदर अल्पवयीन विद्यार्थिनीस माझ्याबरोबर लग्न कर, आपण संबंध ठेवू, असे म्हणून वेळोवेळी पाठलाग करुन त्रास दिला. विद्यार्थिनीने लग्नास नकार दिला म्हणुन आरोपी वैभव विजय औटी याने थेट

अल्पवयीन मुलीच्या घरी जावून लग्नाची मागणी करून विद्यार्थिनीच्या आईच्या व्हाट्सअपवर आत्महत्या करत असल्याचा मेसेज धमकी दिली.या प्रकरणी अल्पवयीन विद्यार्थिनीने भिंगार कॅम्प पोलिसात फिर्याद दिल्यावरून

आरोपी वेभव विजय औटी वय 26 याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी वैभव ओटीला पोलिसांनी तातडीने अटक केली. पुढील तपास पोसई शिंदे करीत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment