सराफ व्यापाऱ्याची लूट करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी केले जेरबंद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :-  राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथील सराफ व्यावसायिकी संतोष मधुकर कुलथे यांच्या कारची काच फोडून सुमारे लाखोंचे सोने – चांदी चोरीस गेल्याची घटना ०८ ऑकटोबर रोजी घडली आहे. याप्रकरणी लोणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या सूचनेनुसार पोलीस पथकाने घडलेल्या घटनास्थळी सीसीटिव्ही फुटेज तपासले व घटनास्थळी असलेल्या साक्षीदारांकडे बारकाईने चौकशी केली. तपासादरम्यान सपोनि मिथुन घुगे यांना गोपनीय माहिती मिळाली की,

सदरचा गुन्हा हा नवनाथ साहेबराव गोडे,( रा. सावळीविहीर, ता.राहाता) याने त्याचे साथीदारांसोबत मिळून केला आहे. व हे आरोपी शिरूर, ता. पुणे येथे एका ठिकाणी लपुन बसले आहे. पोलिसांनी तात्काळ यंत्रणा सतर्क करत शिरूर शहरातून नवनाथ साहेबराव गोडे, (वय ३२ वर्षे, रा. सावळीविहीर, ता. राहाता),

अतुल चंद्रकांत आमले, (वय २४ वर्षे, रा. कर्वेनगर,घोसाळे, जिल्हा पुणे), सागर गोरख मांजरे,( वय २३ वर्षे, रा. मातापूर, ता. श्रीरामपूर, हल्ली रा. शिवाजीनगर,अहमदनगर) यांना ताब्यात घेतले. सदर आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे. तसेच सदर गुन्हा प्रविण नानासाहेब वाघमारे, (वय २४ वर्षे, रा. पिंपळस, ता. राहाता),

व अन्य अल्पवयीन साथीदार यांचेसह मिळुन केला असल्याचे कबुल केले आहे. सदर आरोपोंनी गुनद्यातील चोरलेला माल सदाशिव प्रल्हादराव टाक, (वय ४७ वर्षे, रा खारामळा, शिरूर, जिल्हा पुणे) यास विकल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपींकडुन त्यांनी गुन्ह्यात चोरलेले २१ किलो ७०० ग्रॅम वजनाची चांदी किं.१३,२३,७००/- रू.,

तसेच गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकली बजाज पल्सर २२० सीसी (कि. अं. ७०,०००/-), बजाज पल्सर १५० सीसी (कि.अं. ६०,०००/),असा एकुण १४,५३,७००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष सविस्तर पंचनामा करून जप्त करण्यात आला. सदर अटक करण्यात आलेले आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर विविध पोलीस स्टेशनला गंभीर गुन्हे दाखल आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment