अहमदनगर कोरोना अपडेट्स : जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स वाचा इथे सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ९५८  रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४८ हजार २५४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.१२ टक्के इतके झाले आहे.

 दरम्यान, काल (मंगळवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ४४५ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २७७० इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १५८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८६ आणि अँटीजेन चाचणीत २०१ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४०, अकोले ०३,  जामखेड ०२,  कर्जत ०१, कोपरगाव ०५, नगर ग्रामीण १८, नेवासा ०६, पारनेर ११, पाथर्डी ०४, राहाता १४, राहुरी ०७, संगमनेर १९,  श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर १८, कॅंटोन्मेंट ०९ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ८६ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ३७, जामखेड ०३, नगर ग्रामीण १३, पाथर्डी ०६, राहुरी ०४, शेवगाव ०६, श्रीगोंदा ०३, श्रीरामपूर ०५, मिलिटरी हॉस्पिटल ०६ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २०१ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा १६, अकोले ०५, जामखेड ११, कर्जत १३,  कोपरगाव १२, नेवासा ०६, पारनेर १०, पाथर्डी ४५, राहाता १४, राहुरी ०६, संगमनेर २५, शेवगाव २२, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर १२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १८३, अकोले ५६, जामखेड ३२, कर्जत ३४, कोपरगाव ३०, नगर ग्रा. ५८, नेवासा ४५, पारनेर २५, पाथर्डी ४५, राहाता ८२, राहुरी ७२, संगमनेर १८१, शेवगाव १८, श्रीगोंदा २९, श्रीरामपूर ४८, कॅंटोन्मेंट ०३, मिलिटरी हॉस्पिटल १६ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:४८२१५
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:२७७०
  • मृत्यू:७९६
  • एकूण रूग्ण संख्या:५१८२०

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment