पुराच्या पाण्यात वाहून गेलेले चुलते – पुतण्या सापडले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथील सीना नदीतील बंधाऱ्यात मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोघा चुलत्या पुतण्याचा नदीच्या वाहत्या पाण्यात तोल जाऊन वाहुन गेल्याची घटना घडली होती.

या दुर्दैवी घटनेत तुषार गुलाबराव सोनवणे (वय 22) व सतीश बुवाजी सोनवणे (वय 43 ) हे चुलता पुतणे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते.

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार विशाल नाईकवाडे व पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील हे आपल्या फौजफाटा घेऊन गेले होते. पाण्याचा वेग व अंधार पडल्यामुळे शोध मोहिमेत अडथळे येत होते.

आज बुधवार रोजी सकाळी पावणेसहाच्या सुमारास या दोघांचा मृतदेह हाती लागला असून जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment