तडीपार आरोपीला वाढदिवस पडला महागात…पोलिसांनी केली अटक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना काही काळासाठी तडीपार केले जात असते. मात्र असाच एक आरोपी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी आज शहरात आला मात्र त्याचे बर्थडे गिफ्ट म्हणून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

शहरातून दोन वर्षांकरीता तडीपार असलेला विजय राजू पठारे (रा. सिद्धार्थनगर) हा त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नगर शहरात आला असता तोफखाना पोलिसांनी त्याला अटक केली.

त्याच्याविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी पठारे हा मंगळवारी सकाळी सिद्धार्थनगरमध्ये आला होता.

पठारे हा तडीपार असतानाही शहरामध्ये आला असल्याची गोपनीय माहिती तोफखाना पोलीस स्टेशनला मिळाली. मग काय पोलिसांनी या तडीपार आरोपीला बर्थडे गिफ्ट म्हणून थेट ठाण्यात त्याची रवानगी केली.

दरम्यान तत्कालीन पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणार्‍या 15 टोळ्यातील 67 जणांना जिल्ह्यातून तडीपार केले होते. यातील 54 जणांना 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. यामध्ये विजय राजू पठारे याचाही समावेश आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment