आता शिवसेनेची साई संस्थानकडे ‘ही’ मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे.

मंदिर उघडण्यासाठी विरोधक आग्रही आहेत. आता शिर्डी विधानसभा मतदार संघाचे संघटक कमलाकर कोते यांनी अनोखी मागणी केली आहे. साईबाबा संस्थानने श्री साईबाबांच्या श्रद्धा व सबुरी आणि इतर शिकवणीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी स्वतंत्र दूरदर्शन चॅनलची निर्मिती करण्याचा प्रयत्न करण्यात यावा,

या आशयाची मागणी शिवसेनेचे शिर्डी विधानसभा मतदार संघाचे संघटक कमलाकर कोते यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी के. एच. बगाटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, श्री साईबाबांंमुळे शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थस्थान झाले असून देश-विदेशात ते प्रसिद्ध असे तिर्थस्थान समजले जात आहे.

श्री साईबाबा हे सर्वधर्म समभावाचे प्रतिक असून सबका मालिक एक व श्रद्धा सबुरीचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी तिरुपतीप्रमाणे साई संस्थानने स्वतंत्र दूरदर्शन चॅनल शिर्डीतून सुरू करावे. त्यामुळे साई संस्थानचे सर्व कार्यक्रम व श्री साई मंदिरातील सर्व आरत्या,

विविध धार्मिक कार्यक्रम या चॅनलवर प्रसारित होऊन सर्व भारत व विदेशातही साईभक्तांना घरबसल्या ते पाहता येईल. दरम्यान, शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी ‘सरकारच्या नियमाला पूर्ण बांधिल राहून शिर्डी येथील साईबाबा मंदिर सुरू करावे,’ अशी मागणी शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी केली आहे.

‘कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये, ही दक्षता घेण्यासाठी सरकारने मंदिर बंद केले होते. मंदिर बंद करण्याचा तसा काही विषय नव्हता. तेथे केवळ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढू नयेत, म्हणून ती बंद केली होती. आता टप्प्याटप्याने मंदिरे सुद्धा सुरू होतील,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment