…तर काँग्रेसने शिवसेनेचा पाठिंबा काढला असता; चंद्रकांत पाटील म्हणतात..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- लॉकडाउनच्या काळात सर्वत्र सर्वच ठिकाणे बंद करण्यात आले. त्यात मंदीरांचाही समावेश होता. आता अनलॉकच्या टप्प्यामध्ये अनेक ठिकाणे उघडण्यात आले. परंतु मंदिरे मात्र बंदच आहेत.

महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे मात्र बंदच ठेवली आहेत. भाजपने मात्र मंदिरे उघडण्याबाबत जोर लावला आहे. मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी राज्यभर भाजपचे आंदोलन सुरू असून भाजपच्या आध्यात्मिक समन्वयक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले

यांच्या प्रमुख उपस्थितीत आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी शहरात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण पुकारण्यात आले आहे. यावेळी व्यासपीठावर साधूसंत तसेच वारकरी संप्रदायाचे महंत उपस्थित होते. मंगळवारी दुपारी दोन वाजता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी शिर्डीत उपोषणकर्त्यांची भेट घेत या लाक्षणिक उपोषणाला पाठींबा दर्शवला.

यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका केली. ते म्हणाले ‘राज्यात शिवसेनेने काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन केली म्हणून तुम्ही अयोध्येला गेले नाही. तुम्ही अयोध्येला गेले असते तर काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला असता, असा सनसनाटी टोला लगावत आता शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता आहे’ अशी बोचरी टीका केली.

मंदिरात तुम्ही जात नाही, आम्हाला तर जाऊ द्या ना, मंदिरात काय वाघ सिंह आहेत का ? ते आम्हाला खाणार का, केवळ करोनाच ना, मग तुम्ही बस, रेल्वेसेवा, मॉल, बार सुरू केली त्यावेळी कोरोना तेथे आला नाही का?

मग मंदिरातच का असा प्रश्न उपस्थित केला? तुम्ही मंदिरांसाठी एक विशिष्ट नियमावली तयार करून राज्यातील सर्व मंदिरे उघडावीत, अशी मागणी त्यांनी केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment