बारा तासांनंतर सापडले त्या दोघांचे मृतदेह,तालुक्यात शोककळा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- चोंडी येथे मंगळवारी सायंकाळी मासे पकडण्यासाठी सीना नदीच्या बंधाऱ्यावर गेलेले तुषार गुलाबराव सोनवणे (वय २२) व सतीश बुवाजी सोनवणे (वय ४३) या पुतण्या व काकाचा मृत्यू झाला.

बारा तासांनंतर बुधवारी त्यांचे मृतदेह सापडले. तुषार व त्याचे चुलते सतीश व इतर एकजण असे तिघेजण मासे पकडण्यासाठी बंधाऱ्यावर गेले होते.

दोघेजण बंधाऱ्याच्या खालच्या बाजूला मासे पकडत होते, तर तिसरी व्यक्ती बंधाऱ्याच्या बाजूला बसली होती. पाण्याचा वेग वाढल्याने काका व पुतण्या वाहून गेले.

तिसऱ्या व्यक्तीने गावात जाऊन ही माहिती सांगितल्यावर त्यांचा शोध सुरू झाला. रात्री अंधार असल्याने शोधकार्यात अडथळे येत होते.

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार विशाल नाईकवाडे व निरीक्षक प्रभाकर पाटील पथकासह चोंडी येथे गेले. अंधार असल्याने जनरेटरच्या साहाय्याने त्यांनी शोधमोहीम सुरू केली, पण पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे अडथळा येत होता.

उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती. बुधवारी सकाळी सहा वाजता मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जामखेडला पाठवले. या घटनेने चोंडीसह तालुक्यात शोककळा पसरली आहे

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment