बनावट ओळखपत्र दाखवून दोन तरुणांचा लष्करी हद्दीत घुसण्याचा प्रयत्न

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर येथील लष्कराच्या हद्दीत गुरुवारी (दि.१६) बनावट ओळखपत्र दाखवून आत जाण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

दरम्यान असा प्रकार करण्याऱ्या दोन भामट्यांना भिंगार कॅम्प पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. तुषार ज्ञानेश्वर पाटील व सोपान महारु पाटील (रा.कापूरणी, ता. जि. धुळे) अशी पकडण्यात आलेल्याची नावे आहेत.

दरम्यान याबाबत समजलेली माहिती अशी की, नगरच्या लष्कराच्या हद्दीमध्ये बीटीआर परिसरातून लष्कराचे बनावट ओळखपत्र दाखवून तुषार पाटील व सोपान पाटील ही दोघे तरुण गुरुवारी दुपारच्या वेळेत दुचाकीवर जात होते.

या दरम्यान त्यांना प्रवेशद्वारावर असणा-या जवानांनी थांबवून दोघांकडे चौकशी केली असता त्या दोघांनी लष्कराचे एक ओळखपत्र दाखवले. प

रंतु त्यांनी ओळखपत्राबाबत अधिक माहिती घेतली असता, दोघांनी दाखविण्यात आलेले ओळखपत्र बनावट असल्याचे उघड झाले. यानंतर त्या दोघां तरुणांना भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच दोन्ही भामट्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment