जुगारअड्ड्यावर पोलिसांचा छापा; मुद्देमालासह सात जणांना घेतले ताब्यात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. वाढत्या अवैध धंद्यांना रोख लागावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून आक्रमक कारवाया केल्या जात आहे.

संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील साकूर येथे अवैधरित्या जुगार खेळणार्‍या सात जणांना घारगाव पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून साडेसात हजार रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, साकूर येथील अशोक सदाशिव शेलार याच्या शेतातील घराच्या आडोशाला बिनधास्तपणे तिरट नावाचा जुगार सोमनाथ देवराम शिंदे (बिरेवाडी),

कैलास मोहन आहेर (चिखलठाण, ता.राहुरी), संतोष सखाराम देवकाते (रा.चितळकर वस्ती, साकूर), अशोक नाना कोळेकर (रा.चिंचेवाडी), विलास रावसाहेब केकाण (रा.हिवरगाव पठार), बाजीराव सतू खेमनर (रा.हिरेवाडी),

सतीष अर्जुन बारवे (रा.साकूर) हे सातजण गुरुवारी सायंकाळी साडेपाच ते साडेसहा दरम्यान खेळत होते. याची माहिती पोलिसांना समजताच पोलीस पथकाने जुगारअड्ड्यावर छापा मारत सात हजार सहाशे

चाळीस रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई नामदवे बिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी वरील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment