मुसळधार पावसामुळे या तालुक्यातील नदीला आला पूर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- यंदाची वर्षी पावसाने जिल्ह्यात चांगली हजेरी लावली आहे. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर आता परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे.

मात्र याच परतीच्या पावसाने जिल्ह्यातील अनेक नद्यांना, नाल्यांना पूर आला आहे. नुकतीच श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर जलाशयाच्या लाभक्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पावस कोसळला आहे.

पाण्याचा साठा वाढल्याने जलाशयाच्या सांडव्यातून हंगा नदीत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. परिणामी नदीला पूर आला आहे यामुळे पिंपळगाव पिसा येथील रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला आहे.

हंगा नदीला पूर आल्यामुळे पिंपळगाव पिसा येथील पूल पाण्याखाली गेल्यामुळे या गावच्या माळवाडी, कदमवाडी, एरंडोली, निंबवी, कोंडेगव्हाण या गावांचा पिंपळगाव पिसा व विसापूरबरोबरचा संपर्क तुटला आहे.

या पुलाची उंची अत्यंत कमी जमिनीलगत आहे. विसापूर जलाशय ओव्हरफ्लो झाल्यानंतर नेहमीच हा पूल पाण्याखाली जात असल्याने वरील गावांतील लोकांना नेहमी या पुलाची अडचण येत आहे.

दरम्यान पावसाचा कहर अजूनही काही दिवस असण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. याच अनुषंगाने प्रशासनाने सर्वाना सतर्क व सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment