विखे यांच्या बालेकिल्ल्यात युवक काँग्रेस, एनएसयुआयच्या बैठकीला तरुणांची मोठी गर्दी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला असणाऱ्या शिर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये युवक काँग्रेस, एनएसयुआयच्या संघटनात्मक बैठकीला तरुणांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर हा तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे. काँग्रेस पक्षाने आपल्या युवा फळीला युवक संघटना बांधणीसाठी मैदानात उतरविले आहे. अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष तथा युवक काँग्रेस, एनएसयुआय जिल्हा समन्वयक किरण काळे यांच्यासह युवक जिल्हा कार्याध्यक्ष सोमेश्वर दिवटे,

विद्यार्थी जिल्हाध्यक्ष निखिल पापडेजा हे कालपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज पहिल्या दिवसाची सांगता ही शिर्डी विधानसभा मतदारसंघाची बैठक घेऊन झाली. या बैठकीला शिर्डी मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश थोरात, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रावसाहेब बोठे,

राहता समन्वयक राजेंद्र बोरुडे,सह – समन्वयक गौरव डोंगरे आदी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना किरण काळे म्हणाले की, शिर्डी मतदारसंघांमध्ये काँग्रेसकडे उमेदवार होता. परंतु विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काहींनी अचानक भाजपमध्ये उडी मारल्यामुळे पक्षात जागा रिकामी झाली.

ऐनवेळी पक्षाने सुरेश थोरात यांना उमेदवारी करण्याची दिली. थोरात डगमगले नाही. निर्भीडपणे निवडणुकीला सामोरे गेले. वाडीवस्तीवर जात प्रचार केला. थोरात यांनी मोठ्या संख्येने मतदान घेतले. आज ज्या पद्धतीने युवक या ठिकाणी एकत्र जमले आहेत ही आगामी काळातील बदलाची नांदी आहे.

युवकच या मतदारसंघांमध्ये परिवर्तन करतील अशी अपेक्षा व्यक्त करत यावेळी काळे यांनी युवकांना आगामी जिल्हा परिषद निवडणूक हातात घेण्यासाठी साद घातली. महसूलमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात, युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, आ.डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली युवक,

विद्यार्थी संघटन मजबूत करण्यासाठी काँग्रेस पक्षाची मोर्चेबांधणी सुरू आहे. तरुणांच्या मोठा उपस्थितीमुळे बैठकीमध्ये उत्साहाचे वातावरण होते. अनेक तरुण विद्यार्थी, युवक काँग्रेसच्या माध्यमातून पक्षाशी जोडण्यासाठी इच्छुक असल्याचे यावेळी तरुणांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले.

यावेळी सुरेश थोरात, रावसाहेब मोठे, सोमेश्वर दिवटे, निखील पापडेजा, सुनिल चौगुले, राजू बोराडे यांची भाषणे झाली. विक्रांत दंडवते, उमेश शेजवळ, संदीप गुंड, शेखर सोसे, अमोल बनसोडे, तुषार पोटे, प्रल्हाद शेळके, नवनाथ आंधळे, प्रशांत कोते, उत्तमराव घोरपडे,

गणेश गागरे, सुभाष निमोणे, मुन्नाभाई शेख, नितीन सदाफळ, गोविंद भडांगे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्वराज त्रिभुवन यांनी सूत्रसंचालन केले. युवक काँग्रेस प्रदेश सचिव प्रसाद शेळके यांनी आभारप्रदर्शन मानले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment