कोरोनामुळे या देवीच्या मंदिरात घटस्थापना अत्यंत साधेपणाने

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-  यंदाच्या वर्ष हे कोरोनामुळे अक्षरश हात धुण्यातच गेले आहे. कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्व सणउत्सव अत्यंत साध्य पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यातच शहराजवळील केडगाव येथील प्रसिद्ध देवीच्या मंदिरात देखील अत्यंत साध्य पद्धतीने घटस्थापना करण्यात आली आहे.

श्रद्धास्थान असणाऱ्या केडगावच्या रेणुकामाता मंदिरात कोरोनाच्या सावटामुळे साधेपणाने विधीवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली.

मंदिराबाहेर यंदा भाविकांसाठी ऑनलाईन दर्शन तसेच मुखदर्शनाची सुविधा करण्यात येत आहे. केडगावच्या रेणुकामंदिरात शनिवारी सकाळी ६ वाजता अभिषेक करण्यात आला.

मंदिर परिसरातील मंगळाई देवी, भवानी गुरव यांच्या पादुका, भैरवनाथ मंदिर पूजन, परशुराम पूजन झाल्यानंतर केडगावमधील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल महाराज कोतकर यांच्या हस्ते

विधीवत पूजा होऊन सपत्निक घटस्थापना करण्यात आली. यावेळी महाआरती करण्यात आली. मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

दरम्यान कोरोनाचे संकट कायम असले तरी मंदिरात सालाबादप्रमाणे घटस्थापना, दोन वेळा आरती, ललित पंचमीला कुंकुम आर्चन,

सातव्या माळेला फुलोराचा नैवेद्य, नवमीला होमहवण, दसऱ्याला शस्त्र पूजन आदि धार्मिक विधी नियमाप्रमाणे होणार आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment