परीक्षांच्या गोंधळाबाबत पहा राज्यमंत्री तनपुरे काय म्हणाले…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आलेले आहेत. यातच विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रलंबित असल्याने विद्यापीठाने या परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या ठरवल्या. मात्र काही दिवसापासून या परीक्षांचा गोंधळ सुरु आहे.

याबाबत उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षेत गोंधळ झाला.

काही अभ्यासक्रमांचे, काही विषयांचे पेपर रद्द झाले. दिवसभर महाविद्यालयात बसून, काही विद्यार्थ्यांना परीक्षा न देता माघारी परतावे लागले.

अशा विविध कारणांमुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास झाला, विद्यार्थ्यांना झालेल्या मानसिक त्रासाची जाणीव आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही.

कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

राहुरी फॅक्‍टरी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना मंत्री तनपुरे म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.

मात्र सर्वोच्च न्यायालयाने यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा आदेश दिला. त्यामुळे या परीक्षा घ्याव्या लागल्या.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही. त्यांना पुन्हा पेपरची संधी दिली जाईल. कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे मंत्री तनपुरे यांनी स्पष्ट केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment