बनावट आधारकार्डाच्या आधारे त्यांनी जे काही केल वाचून तुम्हालाही धक्काच बसेल…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :-पारनेर बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड सादर करून बनावट व्यक्तीने हंगे येथील सहा एकर जमिनीची मूळ मालकाच्या परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला.

यासंदर्भात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जमिनीचे बाजारमूल्य सुमारे दीड कोटी आहे. सुपे येथील सव्वादोन गुंठे जमिनीची अशाच प्रकारे विक्री करण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच

हे घडल्यामुळे दुय्यम निबंधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हंगे येथील गट नंबर ५२० मधील सहा एकर जमीन सेंटरीग व्यावसायिक चंद्रकांत विठ्ठल कामठे (६६, कोंढवा बुद्रूक, पुणे) यांच्या मालकीची आहे.

तोतया व्यक्तीने कामठे यांच्या नावाचे बनावट आधार कार्ड, तसेच पॅन कार्ड तयार करून सुपे येथील प्रीतम दिलीपलाल पिपाडा व प्रशांत दिलीपलाल पिपाडा यांना ही जमीन विकली.

या खरेदीखतास मान्यता देणाऱ्या अपर्णा शेजवळ (एकतानगर, चाकण, हल्ली हंगा) यांना ओळख म्हणून संदीप पुरोहित (सुपे), अमोल पाटील (रांजणगाव, शिरूर), भाऊसाहेब थोरात (मुंगशी, पारनेर) यांनी सह्या केल्या.

२३ जुलै २०२० रोजी या व्यवहाराची दस्त नोंद पारनेर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात करण्यात आली. आपली जमीन लाटण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर मूळ मालक कामठे यांनी पोलिसांत तक्रार दिली. सात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment