थोडासा दिलासा थोडीशी चिंता; या तालुक्यात सुरु कोरोनाचा चढ उतार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे. दरदिवशी रुग्णसंख्येचा आकडा घटत आहे. तर कोरोनामुक्तांचा आकडा देखील वाढत आहे.

जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात कोरोनाचा चढउतार अद्यापही कायम आहे. सुरुवातीच्या काळात सुसाट असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आता काहीसा कमी झाला आहे.

यातच कोरोनाबाधितांची आकडेवारीमध्ये सुरु असलेली घट हि काहीशी दिलासादायक ठरत आहे. संगमेनर तालुक्यातील दररोज कोरोनाची आकडेवारी पाहता

दरदिवशी हाती येणार्‍या अहवालातून संक्रमित झालेल्यांच्या संपर्कासह नवीन भागातूनही रुग्ण समोर येत असल्याने धोका अजूनही कायम असल्याचेच संकेत मिळत आहेत.

दरम्यान कोरोनामुळे तालुक्यातील बाधितांची संख्या चार हजारच्या जवळपास पोहचली आहे. सध्या स्थितीला तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 945 वर जावून पोहचली आहे.

एकंदरीत विचार केला असता तालुक्यातील कोरोनाचे संक्रमण हे आजच्या स्थितीला तरी आटोक्यात आहे. व हि परिस्थिती अशीच आटोक्यात ठेवायची असेल तर तोंडावर मास्क,

खिशात सॅनिटायझर आणि सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतर या तिनही गोष्टींना सतत सोबत ठेवून त्याचे पालन करावे लागणार आहे.

गेल्या दोन दिवसांतील घटलेल्या आकडेवारीने संगमनेरकरांच्या चेहर्‍यावर काहीसा आनंद निश्‍चितच निर्माण केला आहे, मात्र आपली एक चूक या आनंदावर विरजन टाकणारी ठरु शकते याचे प्रत्येक नागरिकाने स्मरण ठेवण्याची गरज आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment