नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी एक लाखांची मदत करा; माजी आमदारांनी केली मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हा परतीच्या पावसाने हिरावला आहे.

यामुळे शेतकऱ्यांना एकरी एक लाखांची मदत द्यावी अशी मागणी माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी केली आहे. कुंडलिकराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ नुकताच कर्डिले यांच्या हस्ते झाला.

यावेळी माजी आ.राहुल जगताप यांच्यासह कारखान्याचे पदाधिकारी, संचालक उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी मंत्री कर्डिले यांनी अतिवृष्टीमुळे शेतीचे झालेल्या

नुकसानीचा मुद्दा उपस्थित करीत तातडीने एकरी 1 लाख रुपये मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांच्या संभाव्य पक्षांतरावरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचा कोणताही बडा नेता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याची शक्यता मला वाटत नाही.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment