पवारांच्या त्या सभेवरून आमदार रोहित पवारांची दगाबाजांवर टीका

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात घेतलेल्या शरद पवारांच्या त्या सभेला आज वर्ष पूर्ण झालं आहे. याच जुन्या आठवणींना उजाळा देत आज आमदार रोहित पवार यांनी पक्षातून बाहेर गेलेल्या दगबाजांना चांगलाच टोला लगावला आहे.

सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भर पावसातील ‘ती’ सभा राज्यातील जनतेला भावली आणि विधानसभा निवडणुकीत बदलच घडला.

उदयनराजेंचा त्यांच्याच मतदारसंघात पराभव करण्यातही शरद पवारांच्या त्या सभेने मोठी भूमिका बजावली. आज या सभेची राष्ट्रवादीला, नेत्यांना व कार्यकर्त्यांना आठवण होत आहे.

यावर राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी भलीमोठी फेसबुक पोस्ट लिहून टीका केली आहे.

पहा काय म्हणाले रोहित पवार आपल्या पोस्टमध्ये ‘आज बरोबर एक वर्ष झालं त्या घटनेला, ज्या घटनेची नोंद राज्याच्या राजकीय इतिहासात ठळकपणे झालीच पण विरोधकांच्या स्वप्नांवरही पाणी फेरलं गेलं.

ती ऐतिहासिक घटना म्हणजे माझं दैवत आदरणीय साहेबांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेली जाहीर सभा. काही घटनाक्रम हे मनःपटलावर कायमचे कोरले जात असतात. त्यातील ही एक महत्वाची घटना आहे.

‘ दरम्यान, आपल्या फेसबुक पोस्टमधून रोहित पवारांनी, पडत्या काळात राष्ट्रवादीला सोडून गेलेल्या नेत्यांवर कडक शब्दात टीका केलीय. ‘सर्वसामान्य लोकांसाठी काम करा’,

हा साहेबांनी दिलेला मंत्र दीपस्तंभ मानून काम करण्याचा मीही प्रयत्न करतोय. लोकांनीही मला काम करण्याची संधी दिलीय.

त्यामुळं प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन साहेबांना अभिमान वाटेल असं काम करण्याचा माझा प्रयत्न सुरुय आणि सोबतच साहेबांची ऊर्जाही आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment