दहशत कायम; बिबट्याच्या हल्ल्यात शेळीचे पिल्लू ठार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. प्राण्यांबरोबरच आता बिबट्याचा मोर्चा मानवी वस्तीकडे वळू लागला आहे.

नुकतीच पाथर्डी तालुक्यात एका चिमुरडीवर बिबट्याने हल्ला करत तिला ठार केल्याची घटना घडली. हि घटना ताजी असतानाच श्रीरामपूर मध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शेळीचे पिल्लू ठार झाले आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धनपूर शिवारातील सोमनाथ गुलाब जगताप यांच्या शेळीच्या पिल्लावर बिबट्याने हल्ला केला आहे. शनिवार रात्रीच्या सुमारास हि घटना घडली आहे.

दरम्यान बिबट्याचा मानवी वस्तीवर होणारे हल्ले पाहता परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान बिबट्याचा वाढत वावर पाहता परिसरात तातडीने पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

दरम्यान घटनेची माहिती समजताच वनरक्षक एस.एम. लांडे यांनी संबधित ठिकाणची पाहणी केली आहे. बिबट्याचा वावर पाहता लवकरच या भागात पिंजरा लावु असे वनरक्षक एस.एम. लांडे यानी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment