जेवत बसलेल्या चिमुरडीलाच बिबट्याने केले भक्ष

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- भक्ष म्हणून कुत्री मांजारे कमी झाल्याने बिबट्यानी आपला मोर्चा मानव वस्तीकड़े वळवल्याचे दिसते आहे. जेवण करत असलेल्या एका तीन वर्षांच्या चिमुरडीला बिबट्याने आपले भक्ष बनवले.

पाथर्डी तालुक्यातील मढी गावाजवळ हि दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, पाथर्डी तालुक्यातील मढी गावाजवळील

आमदरा वस्ती येथे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास श्रेया सूरज साळवे (वय ३) ही चिमुरडी घराच्या अंगणात आजी-आजोबांसोबत जेवण करीत होती.

अचानक तिथे बिबट्या आला. काही कळायच्या आतच त्याने श्रेयावर हल्ला केला. आरडाओरड झाल्याने तिला उचलून घेऊन तो पळून गेला. या घटनेची माहिती मिळाल्यावर परिसरातील नागरिक धावून आले.

वनविभागाचे कर्मचारीही आले. सर्वांनी आसपास शोधाशोध केली. रात्रभर शोध घेऊन काहीही मिळाले नाही. ही घटना घडण्यापूर्वी शेजारील एका वस्तीवरही बिबट्या येऊन गेला होता.

त्यानंतर हाच बिबट्या जवळच्याच वस्तीवर आला असावा आणि त्यानेच श्रेयावर हल्ला केल्याचा संशय आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी साळवे यांच्या घरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर श्रेयाचा अर्धवट मृतदेह आढळून आला.

मृतदेह तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. तिच्यावर बिबट्यानेच हल्ला केल्याचे आढळून आले आहे. या हल्ल्याच्या घटनेनंतर आता या परिसरातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे.

या नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी भागातील कार्यकर्त्यांनी वनविभागाकडे केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment