‘ते’ गुटखा प्रकरण आता शिर्डी पोलीस उपअधिक्षकांकडे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- पोलिसांनी श्रीरामपूर तालुक्यातील आठवाडी परिसरातील गोडावूनमध्ये छापा टाकत लाखो रुपयांचा गुटखा व तंबाखू जप्त केली होती. यातील आरोपीसही पोलिसांनी अटक केली.

परंतु याचे थेट राहात्याशी कनेक्शन असल्याचे उघड झाले. त्यांतर संगमनेरमध्येही त्याची व्याप्ती पोहोचली. तेथेही लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

परंतु प्रकरणातील मुख्य आरोपींचा गेल्या 15 दिवसांपासून शोध लागत नाही म्हणून या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख प्रकाश पाटील यांनी आदेश दिल्यानंतर शिर्डी पोलीस उपअधीक्षक़ संजय सातव याच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

याप्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, डीवायएसपी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट गुटखा प्रकरणाचा तपास करत होते.

मात्र या प्रकरणातील आरोपी नगर जिल्ह्यातच असूनही त्यांचा शोधण्यात अपयश आल्यामुळे सदर प्रकरणाचा तपास शिर्डीचे पोलीस उपअधिक्षक संजय सातव यांच्याकडे देण्यात आला आहे.

या प्रकरणात मोठमोठे मासे गळाला लागण्याची शक्यता असून, शिडी पोलीस उपअधिक्षक संजय सातव यांच्याकडे वर्ग केल्यामुळे लवकरच गुटखा प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता पोलीस प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.

आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी विजय चोपडा आणि डेंगळे हे दोघेही पसार असून हे दोन्ही आरोपी नगर जिल्ह्यात असूनही त्यांना जेरबद करण्यात श्रीरामपूर पोलीस अपयशी ठरले. या आरोपींच्या शोधासाठी गुजरातला जावून रिकाम्या हाताने परत आले होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment