महिलेच्या बॅगेमधून पैसे चोरणाऱ्या महिलेस रंगेहाथ पडकले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-  सणासुदीचे दिवस असल्याने बाजारपेठामध्ये खरेदीसाठी गर्दी होत आहे. लोक खरेदीसाठी बाहेर पडत असल्याचा फायदा घेऊन हातचलाखी वापरत महिलेचे दागिणे, बॅग चोरणार्‍या टोळ्या शहरात सक्रिय झाल्या आहेत.

शहरातील गंजबाजार या अत्यंत वर्दळीच्या परिसरात हातचलाखी वापरून महिलेच्या बॅगमधून पैसे चोरत असताना एका महिलेला रंगेहाथ पकडून पोलिसांचा ताब्यात देण्यात आले.

तर तिची साथीदार घटनास्थळावरून फरार झाली आहे. गिता विश्‍वास लोंढे (वय- ३५ रा.श्रीरामपूर) असे पकडलेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी छाया बाळू धिवर (वय- 45 रा. कोंडगाव ता. नगर) यांच्या फिर्यादीवरून गिता लोंढे व एक अनोळखी महिले विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेत गिता हिला अटक केली आहे. दरम्यान गिता लोंढे हिच्या सोबत असलेली दुसरी महिला फिर्यादी यांच्या बॅगमधील

चार हजार रूपयांची रोख रक्कम घेऊन पसार झाली. कोतवाली पोलीस तिचा शोध घेत आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक इमामदार करीत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment