‘स्थायी’चे सभापती कोतकर यांच्यावर होणार ‘ती’ कारवाई ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- भाजपचे नगसेवक असणारे मनोज कोतकर हे ऐनवेळी राष्ट्रवादीत गेले आणि स्थायी समितीचे सभापति झाले. परंतु त्यांच्या या कृतीनंतर पक्षाने त्यांच्यावर पक्षीय कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरजिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या पक्षाच्या शहर कार्यकरणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक नुकतीच झाली. या पदासाठी भाजपकडून कोतकर इच्छूक होते. भाजपनेही त्यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब केले होते.

असे असतानाही कोतकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या अंतिम दिवशी अचानक राष्ट्रवादीत प्रवेश करून त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपने सभापती कोतकर यांना नोटीस देऊन तुमचा पक्ष कोणता ते जाहीर करण्याचे सांगितले आहे. तसेच तसा खुलासा पक्षाकडे करण्यास सांगितले आहे.

यासाठी तीन दिवसांचा अवधी त्यांना दिला होता. मात्र बराच कालावधी लोटला तरीही पुढील कारवाई झालेली नव्हती. मात्र, कोतकर राष्ट्रवादीचे असल्याचा दावा आ. संग्राम जगताप करतात, तर महापौर बाबासाहेब वाकळे म्हणतात कोतकर भाजपचेच आहेत.

सभापती कोतकर यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी रविवारी सायंकाळी उशीरापर्यंत भाजपाची शहर कार्यकारणीची बैठक झाली. यावेळी स्थायीचे सभापती कोतकर यांच्यावर भाजप पक्षाने कायदेशीर मार्गाने कारवाई करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

याबाबतचे अधिकार हे मनपातील गट नेत्या मालणताई ढोणे यांना असून त्यांनी सर्व कायदेशीर बाबींची तपासून आणि त्यांची पुर्तता करून पुढील कारवाई करावी, असा निर्णय घेण्यात आला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment