‘त्या’ गुन्ह्यातील आरोपी गजाआड करण्यात यश

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-14 ऑक्टोबर रोजी कांताबाई बबन घोडेकर या रात्रीच्या वेळी घरामध्ये झोपल्या असताना अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून घटनेतील फिर्यादी कांताबाई घोडेकर यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 32 हजारांचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला होता.

घटनेबाबत बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासासाठी तयार करण्यात आलेल्या पथकाला आरोपी गजाआड करण्यात यश आले आहे. याबाबत सविस्तर असे की, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सुचना केल्या

होत्या. त्याप्रमाणे दिलीप पाटील यांनी पथकातील अधिकारी, कर्मचारी यांना सुचना केल्या. पथकातील अधिकारी, कर्मचारी शोध घेत असताना पोनि. पवार यांना गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा हा किरण भोसले व त्याच्या साथीदारांनी मिळून केला आहे.

पथकातील अधिकारी, कर्मचारी यांनी येळपणे येथे सापळा लावून आरोपी किरण नरवाशा भोसले (वय 50, रा. येळपणे, ता.श्रीगोंदा) यास ताब्यात घेतले. आरोपी किरण भोसले याकडे घटनेबाबत अधिक विश्‍वासात घेवून विचारपूस केली असता त्याने त्याचे साथीदार केशव भोसले, लखन भोसले व शंभू चव्हाण यांच्या मदतीने गुन्हा केला असल्याचे कबूल केले.

सदर माहितीच्या आधारे आरोपींचा येळपणे शिवारात शोध घेतला असता आरोपी केशव किरण भोसले (वय 21) आणि आरोपी लखन किरण भोसले (वय 18) यांस ताब्यात घेतले. त्यांना विश्‍वासात घेवून विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व मुद्देमाल आरोपी शंभू कुंज्या चव्हाण (रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदा) याकडे असल्याचे सांगितले.

शंभू चव्हाण याचा सुरेगाव शिवारात शोध घेतला असता तो मिळून आला नाही. ताब्यात घेतलेल्या आरोपींना बेलवंडी पोलिस स्टेशनला हजर करण्यात आले असून पुढील तपास बेलवंडी पोलिस करत आहेत

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment