जिल्ह्यातील या तालुक्यात साडेदहा कोटींची न्यायालयाची इमारत उभारणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- जामखेड येथील नव्याने बांधण्यात येणाऱ्या न्याय संकुलाची इमारत जामखेडच्या वैभवात भर घालणार आहे. तालुक्यासाठी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांच्याकरीता नवीन न्यायालयीन इमारतीचे बांधकाम करण्यासाठी 6 कोटी 81 लाख रुपयांची मुळ प्रशासकीय मान्यता मिळाली होती.

मात्र अत्याधुनिक सुविधायुक्त न्यायालयीन इमारत बांधणीसाठी मंजुर झालेली रक्कम अपुरी पडत असल्याने गेली दिड वर्षापासुन ही इमारत अपुर्ण अवस्थेत होती.

प्रशासकीय मान्यता असलेल्या कामामध्ये न्यायालयीन इमारतीमध्ये गरजेनुसार लागणारे रस्ते, इमारतीच्या संरक्षणासाठी लागणारी संरक्षक भिंत,

लोक अदालत, न्यायालयीन कामकाजासाठी वापरण्यात येणारे सुसज्ज फर्निचर आदी सुविधा असलेली इमारत मुळ मंजुर रकमेत पुर्ण होणार नव्हती.

ही इमारत सुसज्ज आणि सुविधायुक्त करण्यासाठी मूळ मंजूर निधीत अतिरिक्त 03 कोटी 74 लाख इतक्या रकमेची आवश्यकता होती.

यासाठी आमदार रोहित पवारांचा प्रयत्न सुरू होता. ही रक्कम वाढून मिळावी यासाठी शासन दरबारी अनेकवेळा त्यांनी पाठपुरावा केला होता.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment