राळेगणसिद्धीच्या महिला बचत गटाचा स्तुत्य उपक्रम ; केलेय ‘असे’ काही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-  राज्यात विविध ठिकाणी महिला बचत गट स्थापन करण्यात आले. त्याद्वारे महिलांनी अनेक उपक्रम राबवत आपली आर्थिक प्रगती साधून घेतली.

आता राळेगणसिद्धीच्या महिला बचत गटाने एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे. महिला बचत गटामार्फत पुणे महापालिकेला बस किलोमीटरप्रमाणे भाड्याने दिल्या आहेत.

या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही याचे कौतुक केले असून या महिलांमधून उद्याचे उद्योगपती तयार होतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.

या सर्व बस पुण्यात कात्रज बस डेपोला चालणार आहेत. राळेगणसिद्धी येथे नुकतेच या चार बसचे अनावरण हजारे यांच्या हस्ते झाले.

यावेळी दादा पठारे, गणपत मापारी, बाळासाहेब मापारी, डॉ. गणेश पोटे, गणेश हजारे, देविदास मापारी आदींसह महिला बचत गटांच्या सदस्या उपस्थित होते.

जातेगाव, पळवे, राळेगणसिद्धी येथील या बचतगटांमार्फत पुणे महापालिकेला चार बस भाडे तत्त्वाने सुपूर्द करण्यात आल्या असल्याची माहिती माजी सैनिक दादा पठारे यांनी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment