पालकमंत्री हसन मुश्रीफ गुरूवारी जिल्हा दौ-यावर पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची करणार पाहणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- राज्‍याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्‍हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे येत्या गुरुवारी एक दिवसाच्या जिल्हा दौ-यावर येत आहेत.

या दौऱ्यात ते पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणार असून त्यानंतर अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. त्यांचा जिल्‍हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

गुरूवार दि. 22 ऑक्‍टोबर 2020 रोजी सकाळी 7 वाजता मोटारीने शासकीय निवासस्‍थान मुंबई येथुन चाकण मार्गे ता. शेवगाव ता. पाथर्डीकडे प्रयाण. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत शेवगाव,

ता. पाथर्डी जिल्‍हा अहमदनगर अंतर्गत भालगांव, बोधेगांव गावातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्‍या पिकाची पाहणी. दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.

दुपारी 4 वाजता कोरोना स्थितीबाबत मा. महापौर, मा. जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा, मा. जिल्‍हाधिकारी, मा. मुख्‍य कार्यकारी अधिकारी (जि.प.), मा. जिल्‍हा पोलीस अधिक्षक, महानगरपालिका आयुक्‍त, जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सक,

जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी, संबंधित अधिकारी वर्ग यांच्‍या समवेत समिती सभागृह, जिल्‍हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे आढावा बैठक.

त्‍याचठिकाणी दुपारी 4.45 वाजता अहमदनगर जिल्‍ह्यातील अतिवृष्‍टीमुळे नुकसान झालेल्‍या पिकांबाबत आढावा बैठक. दुपारी 5.30 वाजता नियोजन भवन, जिल्‍हाधिकारी कार्यालय,

अहमदनगर येथे पत्रकार परिषद. सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह येथे पक्ष पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा. सायंकाळी 7 वाजता मोटारीने अहमदनगर येथुन शासकीय विश्रामगृह, पुणेकडे प्रयाण.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment