ढोल बजाव आणि थाळीनाद करत पालिकेवर जाहीर मोर्चा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-  प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला जातो. आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोख्या स्टाईलमध्ये आज पाथर्डी तालुक्यामध्ये आंदोलन करण्यात आले.

नगर परिषद अंतर्गत गेल्या दोन वर्षांपासून शहरांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मजूर झाले होते . सदर घरकुल लाभार्थ्यांनी रीतसर शासकीय नियमानुसार आपल्या घरांची कामे देखील केली.

मात्र शासनाकडून त्यांना घरकुल लाभाची रक्कम ही अर्धवटच मिळाली, त्यामुळे घराची कामे देखील अर्धवट अवस्थेततच बंद पडले, आम्ही यापूर्वी वेळोवेळी पालिकेला मागणी केली.

आंदोलने केली मात्र पालिकेने अद्यापही आमचे घरकुलचे उर्वरित बिले दिले नाहीत. अर्धवट घरे असल्यामुळे आम्हाला पाऊस उन वारा या सर्व गोष्टींचा सामना दररोज करावा लागतो आहे.

तसेच पैसे मिळणार या आशेवर उसने पैसे घेऊन कामास पैसे खर्च केला. पैशासाठी आता सावकाराचे तगाड़े सुरु झाले आहे.

आता आम्हाला त्वरित प्रलंबित असलेले बिल दयावे किवा आम्हाला विष उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आंदोलकांनी केली. वेळोवेळी पाठपुरावा करून देखील शासन आमच्या मागण्यांची दाखल घेत नाही.

प्रशासनाने आता आमचा अंत पाहू नये येत्या दहा दिवसांत आम्हाला आमच्या घरकुलाचे प्रलंबित असलेले बिल दयावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे .

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment