गावकऱ्यांसाठी वरदान ठरलेला तो तलाव तुडुंब पाण्याने भरला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात यंदाच्या वर्षी पावसाने चांगली हजेरी लावली. सर्वदूर झालेल्या या पावसाने जिल्ह्यातील अनेक नद्या, ओढे, तलाव, हे पाण्याने तुडुंब भरून निघाले. यामुळे अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

यातच पारनेर तालुक्यातील ढवळपुरी परीसराला वरदान ठरलेला काळू नदीवरील काळू प्रकल्प यंदा तुडुंब भरला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

ढवळपुरी परिसराला वरदान ठरलेला काळू नदीवरील लघु पाटबंधारे विभागाचा हा तलाव आहे. तो काळू प्रकल्प म्हणूनच ओळखला जातो. अतिशय अडचणीतून व अडथळ्यातून याचे काम पूर्ण झाले आहे.

अडथळ्यांमुळे तब्बल पाच वर्ष या धरणाचे कामकाज चालले. शेवटी या धरणाच्या खर्चाचे बजेटसुद्धा वाढवावे लागले. शेवटी या धरणाचे काम 2010 साली पुर्ण झाले. तेव्हापासून सुमारे चार ते पाच वेळा हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.

या धरणावर ढवळपुरी, भाळवणी, धोत्रे या तीन गावांसह हिवरे कोरडा व चार गावे गोरेगाव, पाडळी, काळकूप व माळकूप या गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत.

त्यामुळे हे धरण भरल्यानंतर सलग दोन वर्ष या गावांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या मिटते. त्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

हे धरण एकदा भरल्यानंतर किमान या परीसराला दोन वर्षासाठी तरी पाण्याची टंचाई भासत नाही. या धरणामुळे या परीसरातील सुमारे एक हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment