गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेला जनावरांचा बाजार पुन्हा सुरु होणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-  नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील जनावरांचा आठवडे बाजार महाराष्ट्रभर प्रसिद्ध असून कोरोना या माहामारी मुळे बाजार गेल्या सात महिन्यापासून हा बाजार बंद आहे.

परंतु एक महत्वाची माहिती समोर येत आहे. घोडेगाव येथील जनावरे व शेळी-मेंढी बाजार शुक्रवार दि.23 ऑक्टोबर 2020 पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नेवासा बाजार समितीचे सभापती कडूबाळ कर्डीले व उपसभापती वसंतराव देशमुख यांनी दिली आहे.

दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आणि दक्षता-खबरदारी घेण्यासाठी शुक्रवार दि.20 मार्च 2020 पासून हा जनावरांचा बाजार बंद करण्यात आला होता.

दरम्यान हा बाजार येत्या दोन दिवसात सुरु करण्यात येणार आहे. याबाबत नेवासा कृषि उत्पन्न बाजार समितीचे वतीने प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे.

दरम्यान महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या घोडेगांव येथील बाजरात राज्यातील व परराज्यातील शेतकरी, व्यापारी जनावरे व शेळी-मेंढी खरेदी-विक्री करण्यासाठी येतात.त्यामुळे बाजार आवारात मोठया प्रमाणात गर्दी होते.

नुकतीच लॉकडाऊनमध्ये शिथिल देण्यात आल्याने उद्योग,व्यवसाय, बाजार भरविण्यास कोरोना नियमांचे पालन करण्याच्या अटी व शर्थीवर परवानगी देण्यात आलेली आहे.

बाजारात येणाऱ्या सर्व शेतकरी, व्यापारी व परिसरातील नागरिकांनी या विषाणूचा संसर्ग टाळणे व दक्षता घेण्याचे सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment