अहमदनगर ब्रेकिंग : निघोज कुंडावरून रिक्षा चालक बेपत्ता

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- मुसळधार पावसामुळे धरणांमधून पाणी सोडण्यात आल्याने कुकडी नदीला आलेल्या पुरामध्ये मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास इसाक रहेमान तांबोळी (वय ३५, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर, जि. पुणे) हा रिक्षाचालक बेपत्ता झाला आहेे.

रांजणगांव गणपती येथील उषा सुरेश जगदाळे यांच्यासह तिन महिला तालुक्यातील जवळे येथे इसाक तांबोळी याची रिक्षा घेउन आल्या होत्या.

नवरात्रीनिमीत्त जवळे येथे जगदाळे यांच्या मुलीस फराळाचे पदार्थ देउन त्या महिला पुन्हा रांजणगांव गणपती कडे परतत होत्या.

जाताना निघोज कुंड येथे दर्शनासाठी या महिला थांबल्या असता रिक्षा चालक इसाक तांबोळी हा तेथून वाहनाऱ्या कुकडी नदीच्या पुरामध्ये पाय धुण्यासाठी गेला होता.

महिला दर्शन घेउन परतल्यानंतर चालक इसाक तांबोळी हा रिक्षाजवळ नव्हता. आजूबाजूला शोध घेउनही तो आढळून आला नाही. त्यामुळे महिलांनी त्यांच्या नातेवाईकांसह इसाक तांबाळी यांच्या नातेवाईकांनाही त्याबाबत माहीती दिली.

पारनेर पोलिसांना माहीती दिल्यानंतर पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. इसाकचे नातेवाईक तसेच पोलिस रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेत होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment