पैसे मागितल्याचा रागातून अहमदनगरमधील विक्रेत्यावर कोयत्याने वार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगरमधील सावेडीतील पारिजातक चौकात भेळ विक्रेत्यावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. विक्रेत्याने आरोपींकडे रगडा कचोरीचे ३० रुपये मागितले.

यावरून आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला. ही घटना काल रात्री पावणे नऊच्या सुमारास घडली असून या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन प्रकाश कसबे असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अधिक माहिती अशी : पारिजात चौकाजवळ सचिन प्रकाश कसबे यांचा भेळ गाडा आहे.

या गाड्यावर काल रात्री पावणे नऊच्या सुमारास एका व्यक्तीने रगडा कचोरी खाल्ली. त्यानंतर संबंधित व्यक्तीला कसबे यांनी रगडा कचोरीचे तीस रुपये मागितले.

या गोष्टीचा राग आल्याने संबंधित व्यक्तीने प्रशांत खरमाळे नावाच्या व्यक्तीला फोन केला. त्यानंतर प्रशांत खरमाळे तेथे आला व त्याने व त्याच्या दोन साथीदारांनी भेळ विक्रेते कसबे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

तसेच कोयत्याने कसबे यांच्या हातावर वार केला. भेळ गाडीवरच्या खुर्च्यांची सुद्धा मोडतोड केली. या घटनेमध्ये कसबे हे जखमी झाले असून,

त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीवरून प्रशांत खरमाळे व त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment