दिवसा ऊन रात्री पाऊस आता नगरकरांची फिटलीये हौस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  वर्षभर शेतात कष्ट उपसल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाती शेतमाल यायच्या वेळी परतीच्या पावसानं धुमाकूळ घातला आहे.

नगर जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. जिल्ह्यात सगळीकडेच कमी-अधिक प्रमाणात मोठा पाऊस झाला. २० ते ३० मिनिटे सुरू असलेला हा पाऊस रात्री साडेआठच्या सुमारास थांबला.

पावसाने हवेत गारवा निर्माण झाला.दिवसभर ऊन असले तरी पावसाचे वातावरण नव्हते. मात्र सायंकाळी अचानक पावसाला सुरवात झाली. शिर्डीमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.

नेवासा व पाचेगाव परिसरातही पावसाने झोडपले. राहुरी, अकोले तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला.नगर तालुक्यातही अनेक ठिकाणी पाऊस झाला.

दरम्यान काल अचानक बरसलेल्या पावसामुळे रस्त्यांवरील नागरिकांना मिळेल, त्या ठिकाणी आसरा घ्यावा लागला. पाऊस जोरदार असल्याने सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचले होते.नाल्याही तुडूंब भरून वाहल्या.

तर ग्रामीण भगाात खरीप पिकांवर संक्रात आली. निसर्गाच्या वक्रदृष्टीमुळे या पिकांची नासाडी होणर असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. पाण्यात बुडालेली पिके काढण्यात शेतकरी व्यस्त असताना मंगळवारच्या पावसाने आता आणखी शेतात पाणी साचले आहे.

दरम्यान परतीच्या पावसाला अनुकूल वातावरण तयार झाल्याने दोन ते तीन दिवसात मान्सून माघारी जाईल, असा हवामान खात्याने अंदाज व्यक्त केला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment