पालकमंत्र्यांचा उद्याचा दौरा भाजपा आमदाराच्या मतदारसंघात !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनामुक्त झाल्यानंतर पहिल्यादांच जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणारे जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ उद्या गुरुवारी (२२ ऑक्टोबर) ला जिल्ह्यात येणार आहे.

पालकमंत्री मुश्रीफ ओला दुष्काळ पाहणीसाठी येणार असून, या दिवशी शेवगाव व पाथर्डी या तालुक्यांतील प्रत्येकी एका गावाची पाहणी ते करणार आहेत. विशेष म्हणजे शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात भाजपच्या मोनिका राजळे आमदार आहेत.

त्यामुळे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या पालकमंत्र्यांकडून भाजप आमदारांच्या मतदारसंघातील ओल्या दुष्काळाच्या पाहणीला दिले गेलेले महत्त्व राजकीय चर्चेचा विषय झाले आहे.

दरम्यान, गुरुवारी दुपारी ३पर्यंत ओला दुष्काळ पाहणीनंतर सायंकाळी नगरला पालकमंत्री मुश्रीफ महाविकास आघाडीच्या घटक पक्ष पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.

त्यामुळे शासकीय समित्यावरील अशासकीय सदस्य नियुक्तीचा विषय यात चर्चेला येण्याची शक्यता आहे. दरम्यान पालकमंत्र्यांचा हा एक दिवसाचा जिल्हा दौरा आहे.

यात ते पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणार असून त्यानंतर अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार आहेत. तसेच त्यानंतर ते सायंकाळी 7 वाजता मोटारीने नगर येथून पुणेकडे प्रयाण करणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment