शिकाऱ्याच्या शोधात बिबट्याची नागरी वस्तीकडे धाव…नागरिकांमध्ये भीतीचे सावट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची वाढती दहशत नागरिकांमध्ये भीतीचे वातारावण निर्माण करू लागली आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील उत्तरेकडील भागात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे.

आजवर गाय, बैल, शेळ्या, मेंढरे यांच्यावर हल्ला करण्याऱ्या बिबट्याने आपला मोर्चा थेट आता मानवी वस्तीकडे वळविल्याने उत्तरेकडील तालुक्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

नुकतेच शिकारीच्या शोधात अनेक बिबट्यांनी नागरी वस्त्यांजवळ आश्रय घेतल्याचे स्पष्ठ झाले आहे. दरम्यान शहरानजीकच्या काही उपनगरातही बिबट्यांच्या दर्शनाने तेथील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

बिबट्यांनी आता थेट शहरी वसाहतींजवळ ठाण मांडल्याने भल्या सकाळी ‘मॉर्निंग वॉक’ करणार्‍यांना मात्र दरदरुन घाम फुटला आहे.

शहरालगतच्या घोडेकरमळा, प्रवरा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून एकाहून अधिक असलेल्या बिबट्यांनी दर्शन दिल्याची चर्चा सुरु होती.

मात्र नागरी आणि समाज माध्यमात चालणार्‍या अशा चर्चांना विश्वासार्हतेचा आधार नसल्याने त्याबाबत कोणी फारसे गंभीर नव्हते.

मात्र वृत्तपत्र वितरीत करणार्‍या शहरातील एका विक्रेत्याला जेव्हा शहर परिसरात बिबट्याचे दर्शन घडले तेव्हा मात्र बिबट्याच्या संचाराच्या वृत्ताने हा संपूर्ण परिसर हादरला आहे.

प्रवरा परिसरात दररोज पहाटे मोठ्या संख्येने नागरिक फिरायला जातात. अनेकजण अंधारातच या परिसरात जात असल्याने बिबट्यांचा संचार त्यांच्यासाठी जीवघेणा ठरण्याची शक्यता आहे.

बिबट्याची दहशत पाहता परिसरात वावरतांना अधिक सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली असून वन विभागानेही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या परिसरात तपासणी करुन पिंजरे लावण्याची आवश्यकता आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment