स्वत:चे अपयश झाकण्याचा राज्य सरकारकडून प्रयत्न – आमदार मोनिका राजळे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- राज्यातील दुष्काळी तालुक्यांना व शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे होऊन पाण्याची पातळी वाढली.

तत्कालीन महायुती सरकारची सर्वात लोकप्रिय व यशस्वी योजनेची महाविकास आघाडी सरकारने राजकीय सूडबुद्धीने एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णयाचा आम्ही निषेध करतो, असे प्रतिपादन पाथर्डी-शेवगावच्या आमदार मोनिका राजळे यांनी केले.

पाथर्डी तालुक्याच्या सीमेवर असलेला घाटशिळ पारगाव मध्यम प्रकल्प या वर्षीच्या जोरदार पावसाने पाच वर्षानंतर प्रथमच ओव्हरफ्लो झाल्याने आमदार राजळे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य रामराव खेडकर होते.

भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष काशीबाई गोल्हार, सभापती गोकुळ दौंड, माजी जि. प. सदस्य सोमनाथ खेडकर, भगवान साठे, पं. स. सदस्य विष्णुपंत अकोलकर, सुनील ओव्हळ, एकनाथ आटकर, सुभाष केकाण, भगवान आव्हाड,

दिनकर गर्जे, महादेव जायभाये, दत्तू पठाडे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन वायकर, शुभम गाडे, काकासाहेब शिंदे, अशोक खरमाटे, संजय कीर्तने, वसंत पवार, वामन कीर्तने, सचिन पालवे, जमीर आतार, बाळासाहेब गोल्हार, शिरूर कासार भाजपचे तालुकध्यक्ष प्रकाश खेडकर, निवृत्ती ढाकणे, विष्णू खेडकर, द्रोपदा खेडकर आदी प्रमुख उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री फडवणवीस व माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या जलयुक्त शिवार योजनेमुळे जलसंधारणाची मोठी कामे झाल्याने अनेक गावाची पाणी पातळी वाढल्याने टँकर बंद झाले. मात्र वर्ष झाले तरी राज्य सरकारचे काम दिसत नाही. सरकार जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करून स्वतःचे अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहे. याचा आम्ही निषेध करतो – आमदार मोनिका राजळे

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reservedp

Leave a Comment