रस्ता गेला वाहून… जीव धोक्यात घालून नागरिक करतायत प्रवास

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  परतीचा पाऊस जिल्ह्यात चांगलाच बरसला आहे. यामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला, तर काही ठिकाणी रस्ते, पूल हे पाण्याखाली गेले.

तसेच पाण्याच्या प्रवाहामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचले गेल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच शेवगाव तालुक्यातील दहिफळ खानापूर हा प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ता खुंटेफळ जवळ अक्षरश: वाहून गेला आहे.

वाहतुकीसाठी धोकादायक बनलेल्या या रस्त्यावरून जायकवाडी धरण परिसरातील रहिवाशी नागरीक जीव धोक्यात घालून प्रवास करत आहे.

2009 साली प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून शेवगावहून खुंटेफळ, ताजनापूर, बोडखे, दहिफळ, एरंडगाव व खानापूर या जायकवाडी धरण फुगवटयाकाठच्या गावांना जोडणारा हा पक्का रस्ता पूर्ण झाला.

काही दिवसापासून तालुक्यात मोठया प्रमाणावर पाऊस सुरु असून त्यामुळे अनेक रस्त्यांची वाताहात झाली आहे. या रस्त्यावरील खुंटेफळ गावाशेजारील स्मशानभुमीजवळ पावसाचे पाणी या रस्त्यावरुन वाहिल्याने एका बाजूने पंधरा ते वीस फुट लांबीचे मोठे भगदाड पडले आहे.

या रस्त्यावरुन रात्री अपरात्री नागरीकांची येजा सुरु असते. समोरुन येणा-या वाहनांचा लाईटमुळे या खड्डयाचा अंदाज येत नाही. त्यामुळे अनेकदा अपघात घडत असतात.

या परिसरात ऊसाचे क्षेत्र जास्त असल्याने कारखान्यांच्या चालू हंगामासाठी ऊसाची वाहतुक याच रस्त्याने सुरु होणार आहे. त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त व्हावा अशी मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment